मौदा तालुक्यातील क्रीडा स्पर्धेमध्ये मुलीचा जास्त सहभाग.
मुलींनी आणला विजय खेचून.
रजत डेकाटे -प्रतिनिधी
उमरेड येथे वायगाव घोटूर्ली येथील शिवाजी मैदानावर पार पडलेल्या जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात पार पडला. मौदा तालुक्यातील विरशी जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ गटा तील कबड्डीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला तर खो-खो मध्ये मौदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चिरव्हा येथील कनिष्ठ गटातील मुलींनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला तर जिल्हा परिषद शाळा चाचेर येथील वरिष्ठ गटातील मुलींनी कबड्डी च्या सामना जिंकून द्वितीय क्रमांक पटकाविला. रेवराल, दहेगाव,नंदापुरी,विरशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी मौदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील नंदापुरी सांस्कृतिक नृत्य व नक्कल आणि वेशभूषा करण्यात आल्या. या यशस्वी कामगिरीनंतर शाळेच्या शिक्षक आणि प्रशिक्षकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला. त्यांनी हा कठोर परिश्रम घेऊन जिद्द आणि चिकाटीने विजय मिळविला.
क्रीडा क्षेत्रात केलेली इतर कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. क्रीडा फक्त खेळ नाही तो आत्मविश्वास आणि जिद्द उभारण्याचे साधन आहे. असे मत शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केले आहे.