मालेवाडा येथील जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
रजत डेकाटे – प्रतिनिधी
भिवापूर -मालेवाडा
विदर्भ नंदन वृत्तसंकलन
भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतून गावात प्रभात फेरी काढण्यात आली होती.प्रथम महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा स्वाती सहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रांगणात राज्य गीत सादर करत कृष्टरोगाची शपथ घेतली व त्यानंतर निपुण भारत अभियानातून कार्य करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मातांचा सत्कार करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित निबंध स्पर्धा घेतली गेली होती. त्यात आपल्या लिखाणाची उत्कृष्ट कार्य शैली दाखविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये व विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक मालेवाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले सांस्कृतिक नृत्य व पथनाट्य अतिशय उत्कृष्टपणे सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर मनोरे सुद्धा सादर केले.या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शिक्षकांनी आठवड्याभरापासून विद्यार्थ्यांमागे अतिशय मेहनत घेतली.
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सहाय्यक शिक्षक सुरज येल्ले तसेच अशोक विद्यालय येथील माजी प्राध्यापक दिगंबर सहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय झोडापे, शिक्षिका भुनेश्वरी सातपुते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिला रोडे यांनी तर सूत्रसंचालन धुरा वर्षा चापले यांनी सांभाळली तर वर्षा कश्यप यांनी आभार मानले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच राखी इंगोले, उपसरपंच फुलचंद मेश्राम, ग्रामसेवक सुनिल तायवाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष यशवंत सातपुते,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विलास मेश्राम,
आरोग्य सेविका मिनल बारंगे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश सहारे, मंगेश तळणकार, मनोहर वानखेडे, स्मिता बावणे, मंदा क्षीरसागर, रेखा येसणसुरे, ज्ञानवंती ढुमणे,दुर्गा सहारे व माजी सरपंच विष्णू कोडापे, माजी उपसरपंच विश्वनाथ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अरुण रामटेके, माजी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रमेश लोणगाडगे, नारायण इंगोले,राजु पसारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामु लाखे,रेकचंद मेश्राम, ग्रामपंचायत कर्मचारी विकास, गोवारदिपे, संगणक परिचालक दिक्षा गोवारदिपे, पोलिस पाटील इंदु गेडाम,प्रतिभा जानवे, भुमिका म्हैसकर, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, आशा वर्कर सुनीता गजघाटे यावेळी मालेवाडा येथील नागरिक मोठया संख्येने शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते.