पारधी बेड्यावर मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा
सव्विस जानेवारी प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद शाळा गरडापार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री धनराज पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते प्रमुख अतिथी म्हणून सदस्य गुणवंत सोलंकी व पूजा पवार होते सर्वप्रथम विद्यार्थ्यांची प्रवास फेरी काढण्यात आली. सौ पूजा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथींनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन घेण्यात आले. विशेष अतिथी म्हणून म्हणून समीर पडोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार मुख्याध्यापक सुनील कुंभारे यांनी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमारी अर्चना गिते, कविता म्हैसकर, कल्याणी पवार, प्रज्वल बालपांडे यांनी सहकार्य केले.