डहाळी जिल्हा परिषद शाळेत 26 जानेवारी गणतंत्र दिन साजरा..
विदर्भ नंदनवन वृत्त संकलन
नागपूर जिल्ह्यातील मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नानादेवी गट ग्रामपंचायत मधील डहाडी वॉर्डात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांच्या विशेष प्रयत्नातून जल्लोषात 76 वा गणतंत्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या कलमांचे मुखपाट सादरीकरण करून संविधानाचा जागर या दिनी केला. व संविधानाचा आत्मा असलेल्या उद्देशिके अनुरूप समता- स्वातंत्रता -बंधुता याचा संदेश दिला. गाव लहान असला तरी देखील विद्यार्थी पटसंख्या ही लक्षणीय असून जिल्हा परिषद शाळा डहाडीला लाभलेले रामटेके सर तसेच सेलोकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात नविन उम्मेद जागविली आहे.(ग्रा.पं. सदस्या )आम्रपाली ताई तांबे,सविताताई बावणे,(ग्रा.पं. सदस्य) अनिलजी वासनिक,नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव , अरविंदजी तांबे यांच्या अथक प्रयत्नातून हिंडालको कंपनीचे मॅनेजर आशिष सर यांनी कंपनी कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डहाडी इथे रंग रंगोटी करून, सात इंच एलईडी टीव्ही युनिट, तसेच विद्यार्थ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (आरो), तर एनटीपीसी मौदा कडून, पीए सिस्टीम लावून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. यापुढे हिंडाल्को कंपनी कडून मुख्य रस्ता ते शाळेपर्यंत अत्यावश्यक रोड लाईट लावून देण्याची मागणी सुद्धा केली आहे . याकडे हिंडालको कंपनीचे मॅनेजर यांनी विशेष लक्ष दिले आहे. कार्यक्रमांमध्ये उपस्थित (माजी ग्रा.पं. सदस्या)कविताताई बावणे, वासुदेवजी बावणे , जयरामजी बावणे,अंगणवाडी सेविका पुष्पाताई वैद्य, मदतनीश लेंदे बाई, गावातील प्रतिष्ठित नागरिक अनिल मानकर, रामचंद्र बावणे, राहुल वासनिक सह संपूर्ण गावातील महिला भगिनी यांनी 26 जानेवारी गणतंत्र दिवस म्हणून उत्साहाने शाळा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढविली.