विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंजाराम राऊत यांचा सत्कार व परिक्षार्थांना निरोप
—————————————-
धामणा लिंगा // ता नागपूर
विदर्भ नंदन वृत्तसंस्था
नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील धामणा लिंगा येथील विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथे सेवानिवृत्त झालेले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पुंजाराम देवराव राऊत यांचा सत्कार तसेच वर्ग १० व १२ च्या विद्यार्थ्यांना निरोपाचा (सेंडाॅप) कार्यक्रम घेण्यात आला.
श्रीकृपा बहुद्देशीय शिक्षण संस्था नागपूरचे व्यवस्थापकीय सचिव श्री सुरेशजी भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ह्याच विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री हेमराज काळे, नवनियुक्त मुख्याध्यापक श्री मोहन नागमोते माजी विद्यार्थी दत्त प्रशांत गोमकार शिक्षिका विमलताई बेहेरे, टोंगे मॅडम,उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्या तर्फे दिप प्रज्वलन करून माता सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पन करून पुजन करण्यात आले त्यानंतर सर्व पाहूणे मंडळी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांमध्ये स्वागत करण्यात आले, कार्यक्रमास ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक निळकंठ बोपटे यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक उमेश कट्यारमल यांनी केले.
यावेळी वर्ग ९ तर्फे वर्ग १० ला तर वर्ग ११ तर्फे वर्ग १२ च्या (माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा) फेब्रुवारी/मार्च २०२५ करीता प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला ह्यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्ग मित्राची गळाभेट घेऊन येथील विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी योग्य शिक्षण दिले व विद्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले असी भावनिक साद घालत ह्या शाळेवर आमचे नियमित प्रेम राहील असे प्रतिपादन विद्यार्थ्यांनी केले.
सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक पुंजाराम देवराव राऊत यांनी ह्या विद्यालयात २९ वर्षे ७ महीने ४ दिवस अशी सलग सेवा देत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सन २०२१ मध्ये मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली ह्या काळात संस्थेसी व विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची सुसंवाद साधून ठेवल्याने त्यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून मान मिळाला.
संस्था सचिव श्री सुरेशजी भोयर व विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंजाराम राऊत यांचा सत्कार
“यावेळी संस्थेचे सचिव सुरेशजी भोयर यांच्या हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंजाराम राऊत यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला तर माजी शिक्षक हेमराज काळे,शाळेतील सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंजाराम देवराव राऊत यांना स्मृती चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या”
विद्यालयाला नावारूपास आणण्यासाठी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले – संस्था सचिव सुरेशजी भोयर
“कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सचिव श्री सुरेशजी भोयर यांनी मार्गदर्शन करताना ह्या शाळेत अनेक अनुभवी शिक्षक होवून गेले तर येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेवून उच्च पदस्त अधिकारी व कर्मचारी झाली ह्या गावात १९८४ मध्ये संस्थेच्या स्थापनेनंतर शाळेचा डोलारा उभा केला अनेक अडचणीवर मात करत आज आपली शाळा नावारुपाला आली ह्या शाळेतील सर्व घटकांनी शाळेच्या विकासासाठी काम केले व पुढेही करतील असे सुतोवाच केले ”
मला ह्या गावाने भरभरून प्रेम दिले धामणा हे गाव माझी कर्मभूमी – पुंजाराम देवराव राऊत (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)
“सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक पुंजाराम राऊत यांनी साश्रू नयनांनी निरोप घेतला त्यांनी सांगितले की मी ह्या गावात सन १९९५ मध्ये एक शिक्षक म्हणून आलो सुरवातीला काही काळ हलाकीचा गेला पण नंतर मात्र मला ह्या गावातील नागरिकांनी खुप साथ दिली आणि माझे ऋणानुबंध जुळले,माझे गाव जरी वर्धा जिल्ह्यातील असले तरी धामणा हे गाव माझी कर्मभूमी आहे येथील गावकऱ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम सदोदित आठवणीत राहील अशी भावनिक साद आपल्या गायनाच्या माध्यमातून राऊत यांनी घातली”
कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मोहन नागमोते यांची मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती
” कनिष्ठ महाविद्यालयीन ज्येष्ठ शिक्षक मोहन नागमोते यांची मुख्याध्यापक म्हणून बढती करून संस्था सचिव सुरेशजी भोयर तसेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक पुंजाराम राऊत यांनी पदभार सोपविला, ह्यावेळी माजी शिक्षक हेमराज काळे, ज्येष्ठ शिक्षक निळकंठ बोपटे, दयाराम चौधरी,लेखनदास किटुकले,दिलीप लाखे, उमेश कट्यारमल, सुरेंद्र वानखेडे यांनी मोहन नागमोते यांचा सत्कार करताना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी देवराव वासेकर, संजय खांडेकर, आकाश देपट, अंकुश शेंडे, विनोद क्षिरसागर, अल्काताई भुसारी यांनी सहकार्य केले.