16.9 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

ताडगाव जिल्हा परीषद शाळेला मोठे सुयश वर्धा जिल्हा परीषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात खो – खो क्रीडा विभागात ताडगाव ला प्रथम पारीतोषिक

ताडगाव जिल्हा परीषद शाळेला मोठे सुयश
वर्धा जिल्हा परीषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात खो – खो क्रीडा विभागात ताडगाव ला प्रथम पारीतोषिक

“ताडगाव” येथिल विद्यार्थी यांना संधी उपलब्ध करून देण्याची लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे गावकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी :- अखिल रोडे

वर्धा / समद्रपूर :-

वर्धा जिल्हा परीषद येथे वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा सोहळ्याचे आयोजन २९ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परीषद क्रीडा संकुल येथे संपन्न झाले. या सोहळ्यात उद्घाटक म्हणून वर्धा जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितीन रहमान व जिल्हा शिक्षण अधिकारी ( प्राथमिक ) डॉ. नितु गावंडे उपस्थित होते.
सांस्कृतिक व क्रीडा उत्सवाचे आयोजनात खो – खो, कब्बडी , लंगडी ई. सांघिक व गोळा फेक , थाळी फेक, १०० मी दौड, २०० मी. दौड अश्या वयक्तिक क्रीडा प्रकारचा समावेश होता. यात “ताडगाव ” संघाने जिल्ह्यात “प्रथम” क्रमांक पटकवला.
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नितीन रहमान यांनी अथक प्रयत्नाने विजय कसा मिळवता येतो या बध्दल मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षणाधिकारी डॉ नितु गावंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा प्रयत्न व मेहनतीच्या भरोशावर चांगले यश कसे संपादन करू शकते याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा परीषद संकुल वर्धा येथे ३१ जानेवारी रोजी खो – खो या क्रीडा प्रकारात ताडगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकावत परीसरात नाव लौकिक मिळवले.

आयोजित विविध स्पर्धेमधील विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी , मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशामागे ताडगाव जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक श्री भास्कर कलाम, सहशिक्षक दिपक गायकवाड , हितेश चौखे यांच्या मोलाचा वाटा आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवामित्र यांनीही विद्यार्थ्यांना सहकार्य केले. ताडगाव येथिल विद्याथ्र्यांचे परीसरात सर्वत्र कौतुक होत आहे. मंगरूळ केंद्राचे प्रमुख श्री संजय ढोक यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले.
अनुराग रोटेले, वेदांत ननावरे, अंश सावसाकडे, जितु दडमल, रौनक ढोणे, प्रिन्स वाघ, विहान श्रीरामे, ज्ञानेश दडमल , आदित्य गुळघे, वेदांत चौधरी, विवांश गजभिये , ऋषभ रोटेले, सक्षम वाघ ई विद्यार्थिनी ताडगाव संघातर्फे सहभाग नोंदविला.
ताडगाव हे गाव समद्रपुर तालुक्यातील आदिवासी गाव असून येथिल विद्यार्थी नावलौकिक मीळाऊ शकते याकरीता जिल्हा प्रशासन व लोकप्रतीनिधी यांनी ताडगाव परीसरात विद्यार्थी व युवकांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावातील नागरीक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मित्र मंडळ ताडगाव यांच्याकडून करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!