पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या होमिओपॅथी तज्ञ डॉ.विलास डांगरे सर यांचा सत्कार.
रजत डेकाटे – प्रतिनिधी
नागपूर येथील परिचियाचे असलेले होमिओपॅथी तज्ञ डॉ.विलास डांगरे सर यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा तपोवन येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजय भैय्या सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होमिओपॅथी तज्ञ डॉ. विलास डांगरे सर यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी सत्कार सोहळा पार पडला.
नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणय हाडके, शंकर देवगळे, रजत डेकाटे यावेळी उपस्थित होते.