जि.प. शाळा मालेवाडा येथे संत गाडगे बाबा यांची जयंती
साजरी
हातात झाडू घेऊन विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी
रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर/ मालेवाडा
भिवापूर प्रतिनिधी:-भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील उच्च प्राथमिक शाळा येथे कर्मयोगी राष्ट्रसंत, स्वच्छतेचे जनक पूज्यनीय गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वातीताई सहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश लोनगाडगे व ग्रामपंचायत सदस्य दुर्गाताई सहारे आदी मान्यवर प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे माल्यर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामस्वच्छता अभियानाचा औचित्य साधून शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन गावात प्रभातफेरी काढली. विशेष म्हणजे शाळेतील अंश लोनगाडगे व तेजस सहारे हे विद्यार्थी गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत ग्रामस्थांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले.
यासोबतच विद्यार्थिनींनी स्वच्छतेवर आधारित नृत्य सादर केले. सहाय्यक शिक्षक सुरज येल्ले यांनी गाडगेबाबा जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सहाय्यक शिक्षिका भुमेश्वरी सातपुते यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा चापले यांनी तर संचालन मुख्याध्यापिका शिला रोडे यांनी तर वर्षा कश्यप यांनी आभार मानले.
यावेळी शिक्षणसेवक अजय झोडापे,अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, श्रीराम डवरे,कवडु सहारे, रजत डेकाटे आदींची उपस्थिती होती.