मालेवाडा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
विद्यार्थ्यांच्या वेशभूषेचे नागरिकांना कडून कौतुक.
रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर / मालेवाडा
जागतिक महिला दिनानिमित्त मालेवाडा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
मालेवाडा येथील शाळेतील मुख्याध्यापिका शिला रोडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त माहिती देत शिला रोडे यांनी पुढील कार्यक्रमाला गती देत सूत्र हाती घेतली.
विशेष म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी स्वच्छतेवर सांस्कृतिक नृत्य सुद्धा सादर केले. मालेवाडा येथील सरपंच राखी इंगोले यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले.
महिला बचत गटातील महिलांचा सुद्धा शाळेच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे विद्यार्थी तेजस सहारे यांनी गाडगेबाबांच्या वेशभूषेत तर महात्मा गांधीच्या वेशभूषेत अंश लोनगाडगे व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत प्रणिती बावणे या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या नेमावली माटे, ग्रामसेवक सुनिल तायवाडे,गुरुदेव सेवा मंडळाचे बेबी काकडे, उद्धव खाडे, उपसरपंच फुलचंद मेश्राम, माजी सरपंच नारायण इंगोले, राजू पसारे, यशवंता सातपुते,दिगांबर सहारे,स्वाती सहारे, वर्षा चापले, वर्षा कश्यप, ग्रामपंचायत सदस्य व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका शिला रोडे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक सुरज येल्ले यांनी मानले.