सोनपुरी गावात घाणीचे साम्राज्य निर्माण,
प्रशासनाचे उडवा उडवीचे उत्तर..!
सुरज भोजेकार उमरेड प्रतिनिधी
गट ग्रामपंचायत निरव्हा अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी गावात गेल्या अनेक दिवसापासून नालीमध्ये घाण निर्माण झाली आहे. यात स्थानिक प्रशासन सुस्त निद्रावस्थेत आढळून येत आहे. कचरा व दूषित पाणी त्या नालीमध्ये सोडले जाते यात नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम दिसून आला आहे. नालीमध्ये साचलेल्या घाणीमुळे दुर्गंध पसरत आहे हा दुर्गंध नागरिकांच्या जीवावर बेतणारा आहे. मात्र स्थानिक प्रशासन पूर्व उडीचे उत्तर देत याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावाच्या मुख्य चौकात ती नाली असून त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरू असते. हा सोनपुरी गावाचा चौक असल्याने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
गावातील आरोग्याची स्थिती पाहता प्रशासन थंड बस्त्यात दिसून येत आहे.