मौदा येथील होमगार्डने लावला गृहखात्याला चुना….
सेवानिवृत्ती होमगार्ड विजय मेहर यांचे आरोप
मौदा:-येथील होमगार्ड समादेशक यांनी केंद्रनायक यांना हाताशी धरून लावला गृह खात्याला चुना डयुटी मदतगार, केंद्रनायक व तालुका समादेशक यांचे आर्थिक हित संबंध.
मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी अरूण मेहर सनद कमांक १५६९ यांनी डयुटी मदतगार व केंद्रनायक यांचा संगणमताने गेल्या दोन वर्षा पासुन शासनाचा तिजोरीला चुना लावण्याचा कृत्य चालु असल्याचे समजले, याबाबत होमगार्ड मधील एका वरीष्ठ अधिका-याने वारंवार लेखी तक्रार जिल्हा कार्यालय व जिल्हा समादेशक साहेब यांना करूण सुदधा; आज पर्यंत कोणतीही चौकशी झाली नाही. उलट त्यांनाच बंदोबस्तवर घेत नाही, घेतले तर त्यांना इतरत्र बंदोबस्तवर पाठविण्याचे कृत्य करूण मानसिक त्रास देणे सुरू आहे.
मौदा येथील होमगार्ड तालुका समादेशक अरूण मेहर यांचे जयस्तंभ चौक मौदा येथे किराणा दुकाण आहे ते बंदोबस्त वेळी होमगार्ड युनिफॉर्म घालुन बंदोबस्त वर हजर न राहता आपले किराणा दुकाणामध्ये बसून राहत असतात. कर्तव्याच्या नावावर मुसाफिरी करणाऱ्यां या तालुका समादेशक वर इतर जिल्हा प्रशासन काय?कार्यवाही करणार असा प्रश्न नाव प्रकाशीत न करण्याच्या अटीवर मौदा येथील त्रस्त होमगार्ड यांनी प्रस्तुत प्रतिनीधीला सांगीतले. आजपर्यंत शासनाच्या पैशावर मजा करनाऱ्यां या अधिका-यावर काय कार्यवाही होणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच कृत्यामुळे वेलतुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्याचे माहितीस मिळाले. तसेच मौदा येथे सुदधा केव्हा गुन्हा दाखल होइल? असे आरोप विजय मेहर यांनी केले आहे.तर याकडे सर्वच हामगार्डचे लक्ष लागले आहे.