नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यामध्ये दहाडी ला रंगपंचमी वर सैराट लावणी कार्यक्रम साजरे..
नानादेवी( डहाडी):- रंगपंचमी उत्सव निमित्त डहाडी येथे शिवाजी मंडळ डहाडी तर्फे सैराट लावणी ग्रुप कडून लावणी डान्स चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व सैराट लावणी ग्रुप कडून कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी शैलेशजी उथखेडे सर यांचा सत्कार शिवाजी मंडळ डहाळी कडून करण्यात आले.
उपस्थित अवंतिका ताई लेकुरवाडे, जि. प. माजी सभापती महिला व बालकल्याण विभाग, माजी जी. पं. सदस्या शालिनीताई देशमुख,सारिका शैलेशजी उथकडे शिक्षिका एंनटीपीसी मौदा, ज्ञानेश्वर जी वानखेडे अध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी, अनिलजी वासनिक सदस्य ग्रामपंचायत नानादेवी, प्रफुल भोयर सामाजिक कार्यकर्ता मौदा तालुका,अश्वजित वासनिक, नितेश बावणे, अमोल बावणे,प्रशांत लेडे,राहुल वासनिक व सर्व गावकरी मंडळी या प्रसंगी उपस्थित होते.