14.1 C
New York
Saturday, March 29, 2025

Buy now

डॉन अरूण गवळीची तुरुंगातून कायमची सुटका या नियमामुळे डॅडी बाहेर येणार?

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची सुटका करण्याचे निर्देश दिलेत. एक महिन्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याबाबत जेल प्रशासनाने निर्णय घेण्याचे कोर्टाने निर्देश दिलेत.

अंडरवर्ल्ड डॉन, गँगस्टर अरुण गवळी यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एक महिन्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याबाबत जेल प्रशासनाने निर्णय घेण्याचे कोर्टाने निर्देश दिलेत. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीची शिक्षेतून सुट देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. |

अखेर नागपूर खंडपीठाने अरूण गवळी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे. २००६ च्या निर्णयानुसार वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या, अशक्तपणा आणि निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते, याच ग्राऊंडवर अरुण गवळीला दिलासा मिळाला आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळी गेले १४ वर्षांपेक्षा जास्त जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सध्या अरुण गवळी यांचं वय ७५ आहे.

एकेकाळी दाऊद इब्राहिमला मारण्यासाठी अरूण गवळीनं मोठं पाऊल उचललं होतं. आता तोच अरूण गवळी तरूंगातून बाहेर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!