16.9 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या टिप्पर ट्रक ला पकडले एक आरोपी अटक , ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ,

अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या टिप्पर ट्रक ला पकडले

एक आरोपी अटक , ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ,

नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथकाची कारवाई

प्रतिनिधी -प्रशांत मसार

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा चौक येथे नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथकांनी नाकाबंदी करुन अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या सोळा चाकी टिप्पर ट्रक ला पकडुन ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.३) मई ला सायंकाळी ७ वाजता च्या दरम्यान नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशेष पोलीस पथक अवैध धंधे रेड कामी खाजगी वाहनाने कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि मनसर कडुन कन्हान कडे एक टिप्पर वाहन अवैधरित्या विनापरवाना वाळु लोड करुन नागपुर कडे वाहतुक करीत आहे . अश्या मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी तारसा चौक येथे नाकाबंदी करीत असतांना मनसर कडुन येणारा संशयित सोळा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच ४० सी एम ७७५२ ला थांबवुन चालकास नाव विचारले असता त्याने आपले नाव अरविंद जगदिश संकेत (वय २५) रा.ग्राम देवरी , तह.बहेरी , जिल्हा सिदी , ह.मु चनकापुर काॅलोनी ,तह.सावनेर,जिल्हा नागपुर असे सांगितल्याने पोलीसांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनात मोठ्या प्रमाणात वाळु दिसुन आल्याने पोलीसांनी वाहन चालकास रेती बाबतचा परवाना विचारला असता चालकाने नसल्याचे सांगितले . सदर अवैध चोरीचे वाळुने भरलेले वाहन हे बामणी तह.तुमसर , जिल्हा भंडारा येथील अवैधरित्या सुरु असलेल्या रेती स्टाॅकवरुन वाहन मालक बलराम यादव यांचे भाऊ व बिझनेस पार्टनर क्रिष्णा यादव रा.चनकापुर काॅलोनी, सावनेर यांचे सांगणेवरुन टिप्पर ट्रक भरुन नागपुर येथे नेत असल्याचे चालकाने कबुल केल्याने पोलीसांनी वाहन चालक अरविंद संकेत याला अटक करुन त्याचा जवळुन टिप्पर ट्रक क्रमांक एम एच ४० सी एम ७७५२ किंमत ४०,००,००० रु , दहा ब्रास वाळु किंमत ५०,००० रु , एक एंड्राइड ऑनर कंपनी चा मोबाइल किंमत १०,००० रु असा एकुण ४०,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक किशोर आनंदराव शेरकी यांचा तक्रारी वरून आरोपी १) अरविंद संकेत , २) बलराम यादव , ३) क्रिष्णा यादव यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन दोन आरोपीचा शोध घेत आहे .

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचा मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी , प्रणय बनाफर , कार्तिक पुरी , बालाजी बारगुले सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!