वर्षाताई देठे यांनी पिरिपाच्या कार्यकर्त्यांना राखी बांधली
रजत डेकाटे प्रतिनिधी नागपूर
विदर्भ नंदन वृतसंकलन
नागपूर येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रमाई ब्रिगेडच्या विदर्भ अध्यक्षा वर्षाताई देठे यांनी रक्षाबंधनानिमित्त इंदोरा येथील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांना राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोंबले, पिपल्स रिपब्लिकन पार्टी नेते बाळूमामा कोसमकर यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला.
पहिल्यांदाच रक्षाबंधनाचा कार्यक्रम इंदोरा येथील पिपल्स रिपब्लिकन पार्टी कार्यालयात संपन्न झाला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्षाबंधन निमित्त आनंदाचे वातावरण दिसून आले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रमाई ब्रिगेडच्या विदर्भ अध्यक्षा वर्षाताई देठे या पक्षाला नवी ओळख निर्माण करून देण्याचे काम करतील अशी भावनिक साद कार्यकर्तांनी दिली होती ती आज खरी ठरली असे प्रणय हाडके यांनी म्हटले.
यावेळी प्रणय हाडके, प्रकाश मेश्राम, रमेश गेडाम, मोरेश्वर दुपारे, दिनेश बोळघाटे, रजत डेकाटे
संघमित्रा पाटोळे, कुसुमताई गेडाम,सविता मेश्राम यावेळी आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.