नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी – डी. के. साखरे
कवाडे, कुंभारे सत्तेच्या तुकड्याकरीता लाचार !
सोलापूर :-शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी नागपूर येथील संविधान चौकात महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या विटंबनेप्रकरणी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी समस्त आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या दोघांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.25 ऑक्टोबर ला नागपूरच्या संविधान चौकात जो प्रकार घडवून आणला तो अत्यंत किळसवाना असून त्यामुळे या देशातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.यापूर्वी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संविधान चौकात लाखोंच्या संख्येने लोक जमा झाले होते परंतु कधीही असा प्रकार घडला घडला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाणीवपूर्वक व जातीय मानसिकतेतून जय श्रीरामच्या धार्मिक घोषणा देऊन व पुतळा परिसराची मोडतोड करून सामाजिक तेढ निर्माण केली आहे.यावेळी स्वयंघोषित राष्ट्रीय नेते जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, सुलेखा कुंभारे व मिलिंद माने यांनी बघ्याची भूमिका घेतली असून कवाडे व कुंभारे हे सत्तेच्या तुकडयाकारिता लाचार झाले असल्याचे साखरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांना विचारतो की, कुठल्याही मंदिरात जाऊन जय भीम च्या घोषणा देऊ शकतो का ?तसेच तिथल्या परिसराची तोडफोड व खराब केला तर चालतो का ?त्यांचे उत्तर हो असेल तर जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे व सुलेखा कुंभारे यांना मंदिरामध्ये नेऊन तसे करायला सांगा असेही साखरे यांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.येत्या दोन दिवसात गडकरी व फडणवीस यांनी आंबेडकरी जनतेची जाहीर माफी न मागितल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही साखरे यांनी दिला आहे.