परभणी घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको
संविधानाचे रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी – डी. के. साखरे
मंगळवेढा :-भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानाचे रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक डी. के. साखरे यांनी केले.परभणी येथे देशद्रोही समाजकंटकाने केलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 18.12.2024 रोजी मंगळवेढा येथील शहीद किसन माने चौक (जुना बोराळे नाका )येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते मारुती (एम. के.)गायकवाड, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, विक्रम अवघडे, खंडू खंदारे, गणेश धोत्रे,मराठा आघाडीचे पोपट पडवळे,विजय शिकतोडे, सिद्धार्थ लोकरे,सागर जाधव,जनार्धन अवघडे,लक्ष्मण गायकवाड, नितीन सोनवले, विकास सोनवले,प्रदीप परकाळे,अशोक शिवशरण, प्रदीप खवतोडे,सागर जाधव, सागर खरबडे, नेताजी अवघडे, बाळासाहेब निकम, सुभाष भंडारे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना साखरे म्हणाले की, संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ असून भारत देश संविधानावर चालतो.संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधीकाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची राज्य व केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी अशा विविध मागण्या आंदोलकर्त्यांच्याकडून करण्यात आल्या.यावेळी ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड, सिद्धार्थ लोकरे, धनाजी माने, प्रदीप परकाळे व पोपट पडवळे आदिनी आपल्या मनोगतातून परभणी घटनेचा निषेध नोंदविला.
यावेळी मंगळवेढा तहसील च्या नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.तर
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी जातीने उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.