spot_img
spot_img
spot_img
spot_img

मालेवाडा येथे हँडपंपाला कुंपण; ग्रामस्थांमध्ये आश्चर्य ‘जल जीवन मिशन’ नेमके कुणासाठी?

मालेवाडा येथे हँडपंपाला कुंपण; ग्रामस्थांमध्ये आश्चर्य ‘जल जीवन मिशन’ नेमके कुणासाठी?

मालेवाडा विदर्भ नंदन वृत्तसेवा

भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील गोटाळी या वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हँडपंप व जल जीवन मिशन अंतर्गत नवीन निर्माण केलेला बोरवेल भोवती कुंपण उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच परिसरात कपडे धुण्याचे ओटे व गुराढोरांना पाणी पिण्यासाठी मोठे टाके सुद्धा आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या या हँडपंपाला कुंपण घातल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हँडपंप हा सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र त्याभोवती कुंपण उभारल्याने नागरिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नेमके कुणाच्या आशीर्वादाने किंवा आदेशाने कुंपण उभारण्यात आले, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जल जीवन मिशनच्या ध्येय्यपूर्तीला तडा देण्याचा अधिकार कुणी दिला असाही या निमित्ताने प्रश्न निर्माण झाला आहे.

सार्वजनिक सुविधेवर अशा प्रकारे निर्बंध निर्माण करणे योग्य आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी तसेच ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मालेवाडा येथील या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत अधिकृत खुलासा होण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Epaper Website

Related Articles

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर नागपूर, दि. १ सप्टेंबर २०२६ — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने बजाज नगर येथील पक्ष...

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा मौदा, दि. २ सप्टेंबर — मौदा तालुक्यातील अदासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘श्री क्षेत्र बल्याची...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!