spot_img
spot_img
spot_img
spot_img

उदासा येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद..

 

३५० ते ४०० ते नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

रजत डेकाटे प्रतिनिधी

उमरेड/ मालेवाडा:- उमरेड तहसील अंतर्गत येत असलेल्या उदासा येथे सुधीर पारवे फाउंडेशन व लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था भिवापूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य संजय भेंडे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुधीरजी पारवे, अनिल गोविंदानी संघचालक उमरेड नगर, बाजार समिती उमरेडचे सभापती रूपचंद कडू यांची यावेळी उपस्थिती लाभली होती.

वायगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला वृद्ध माता भगिनी शेतकरी बांधव व लहान मुले आणि मोठ्या अशाने शिबिरात सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी प्रथमच तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेतली. हीच या उपक्रमाची खरी ताकद आणि समाधाना आहे. बालरोग, नाक- कान -घसा,त्वचा रोग विविध शस्त्रक्रियांसंदर्भातील तपासण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. गरजू रुग्णांची पुढील उपचारांसाठी नोंदणी करण्यात आली होती. शिबिरात ३५०ते ४०० नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.नागरिकांनी रक्तदान सुद्धा केले.

समाजसेवा हीच खरी लोकसेवा मानत नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे माजी आमदार सुधीर पारवे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार कोहपरे यांनी केले तर आभार उदासा येथील सरपंच सुधाकर कडू यांनी मानले.

Epaper Website

Related Articles

मौदा मे संत कबीर जन्मोत्सव पर निकली भव्य शोभायात्रा..

**मौदा में संत कबीर जन्मोत्सव पर निकली भव्य शोभायात्रा, सामाजिक सद्भाव का दिया संदेश**   मौदा:-एस.के.डी.वी. मिशन, मौदा के तत्वावधान में संत कबीर जन्मोत्सव श्रद्धा एवं...

देश वासियों की सेवा करणे निकले निष्पक्ष युवक की एन्काऊंटर के नाम पर ली जान…?

बिहार मे चल रहा है जंगल राज! तिवारी एन्काऊंटर ने देश की उडाई नींद... संविधान मौलिक अधिकार कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य का बिहार पोलीस ने...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!