spot_img
spot_img
spot_img
spot_img

२९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; जनआंदोलनातील खटल्यातून दोषमुक्ती

 


२९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; जनआंदोलनातील खटल्यातून दोषमुक्ती

नागपूर: नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी २९ वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून माजी उपमहापौर व नगगरसेवक किशोर कुमेरिया यांची अखेर निर्दोष (दोषमुक्त) सुटका झाली आहे. तब्बल तीन दशकांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल देत त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

काय होते नेमके प्रकरण?

नागरिकांना पाणी मिळावे या मागणीसाठी १९९७ मध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान मनपा झोन-५ कार्यालयात शिरून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि टेबल, काच, टेलिफोन व फर्निचरचे सुमारे २,००० रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांवर ठेवण्यात आला होता. मनपा झोन-७ चे तत्कालीन सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात ६ जून १९९७ रोजी (गुन्हा क्र. ३०५/१९९७) भादंवि कलम १४३, १४७, ४४८, ४२७, ३३२, ३५३ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२९ वर्षांनंतर न्याय; न्यायालयाचे निरीक्षण

सक्करदरा पोलीस ठाण्यातील या जुन्या गुन्ह्याचा सत्र खटला (सत्र प्रकरण क्र. ७६३/२०२५) अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२० पंकज एस. पांडे यांच्या न्यायालयात सुरू होता. या प्रकरणात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. किशोर कुमेरिया यांचे अधिवक्ता राम मसूरके यांनी जोरदार युक्तिवाद केला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर, प्रत्यक्ष कृतीचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी दोषमुक्तीचा आदेश पारित केला. *त्याच प्रमाणे २००६ मधील उमरेड रोड वीज उपकेंद्रातील घटना* नोंद उपलब्ध कागदपत्रांमध्ये सक्करदरा पोलीस ठाण्यातील पहिली खबर देखील नमूद आहे.

तक्रारीचा तपशील: महावितरणच्या उमरेड रोड उपकेंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी कार्यालयात शिरून शिवीगाळ व मारहाण केली तसेच कार्यालयातील टेलिफोन व मोबाईल खाली आपटून सुमारे ३,५०० रुपयांचे नुकसान केले.

गुन्ह्याची कलमे: या प्रकरणी भादंवि कलम ३५३, ४४८, २९४, ५०६, ३२४/३२३, ४२७ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची नोंद कागदपत्रांमध्ये आहे. या प्रकरणात सुद्धा माननीय जिल्हा न्यायालयाने आज दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दोष मुक्त करून दिलासा दिला.

जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय

तब्बल २९ वर्षे सुरू असलेल्या या खटल्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले; काळाच्या ओघात या प्रकरणातील काही आरोपींचे निधनही झाले. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि पाण्यासाठी केलेल्या आंदोलनात अडकलेल्या माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना अखेर न्यायालयाने दोषमुक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

Epaper Website

Related Articles

मौदा येथे संविधान दिवस प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

मौदा येथे संविधान दिवस प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ नंदन वृत्तसेवा न्यूज शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच मौदा, ओबीसी जन मोर्चा नागपूर, भारतीय बौद्ध महासभा मौदा,...

शिवराया मंडई उत्सवाची उत्साहात सांगता; माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून स्व. उमेश बाग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन खंडाळा-पिपरी येथे शिवराया मंडई उत्सवाचा दोन दिवसीय...

  शिवराया मंडई उत्सवाची उत्साहात सांगता; माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून स्व. उमेश बाग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन खंडाळा-पिपरी येथे शिवराया मंडई उत्सवाचा दोन दिवसीय सोहळा; सांस्कृतिक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!