spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिवराया मंडई उत्सवाची उत्साहात सांगता; माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून स्व. उमेश बाग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन खंडाळा-पिपरी येथे शिवराया मंडई उत्सवाचा दोन दिवसीय सोहळा; सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

शिवराया मंडई उत्सवाची उत्साहात सांगता; माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून स्व. उमेश बाग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

खंडाळा-पिपरी येथे शिवराया मंडई उत्सवाचा दोन दिवसीय सोहळा; सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खंडाळा-पिपरी : शिवराया मंडई उत्सव खंडाळा यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मंडई उत्सवाची विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उत्साही वातावरणात सांगता झाली. सांगता समारंभाला माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी स्वर्गीय उमेश बाग यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर मंडई उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले, माजी पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेश ठवकर, खरेदी-विक्री सभापती युवराज ठाकरे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, माजी नगरउपाध्यक्ष राजेश निनावे, खरेदी-विक्री संचालक मंगला कोंगे, चंद्रभान किरपान, रवींद्र फटिंग, सिन्नू यागंटी आणि लाटारू बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवराया मंडई उत्सवानिमित्त गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पारंपरिक लावणी, खडीगंमत, तुर्रा-कळंगी, पंचशील गायन पार्टी तसेच लोककलेच्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण भागातील पारंपरिक लोककला आणि संस्कृतीचे दर्शन या उत्सवातून घडले. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.महिला, युवक आणि नागरिकांनी कार्यक्रमांना मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.

मंडई उत्सव हा ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणारा उपक्रम आहे. अशा उत्सवांमुळे गावातील नागरिक एकत्र येतात आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो. दोन दिवस चाललेल्या या उत्सवाची उत्साहात सांगता झाली. उपस्थित मान्यवरांनी शिवराया मंडई उत्सवाच्या आयोजकांचे कौतुक करून अशा सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचे आवाहन केले.

Epaper Website

Related Articles

मौदा येथे संविधान दिवस प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

मौदा येथे संविधान दिवस प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ नंदन वृत्तसेवा न्यूज शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच मौदा, ओबीसी जन मोर्चा नागपूर, भारतीय बौद्ध महासभा मौदा,...

२९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; जनआंदोलनातील खटल्यातून दोषमुक्ती

  २९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; जनआंदोलनातील खटल्यातून दोषमुक्ती नागपूर: नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी २९ वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल झालेल्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!