spot_img
spot_img
spot_img
spot_img

मौदा येथे संविधान दिवस प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

मौदा येथे संविधान दिवस प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ नंदन वृत्तसेवा न्यूज

शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच मौदा, ओबीसी जन मोर्चा नागपूर, भारतीय बौद्ध महासभा मौदा, समता सैनिक दल मौदा, आधारस्तंभ बहुउद्देशिय संस्था मौदा, मैत्री हॉस्पिटल मौदा यांच्या संयुक्त विद्यामानाने संविधान दिनानिमित्त तहसील कार्यालय समोर, मौदा,जि. नागपूर येथे दि.२६ नोव्हेंबर २०२६ गुरुवरला सविधान दिवस प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दीपंकर नगराळे (मैत्री हॉस्पिटल मौदा) यांच्या हस्ते संपन्न झाले व प्रास्ताविक महेंद्रपाल खोब्रागडे यांनी केले तर अध्यक्ष स्थान प्रेमदास मेश्राम यांनी भूषविले. यावेळी संविधान व महापुरुषांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संविधान अभ्यासक शब्बीर पठाण, शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच मौदाचे अध्यक्ष प्रकाश शंभरकर, ओबीसी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष जगदिश वाडिभस्मे, शिवराज्य वक्ता अकाडमीचे संचालक जितेंद्र मेश्राम,राजेंद्र पिसे,अशोक गजभिये उपस्थित होते. सर्व वक्त्यांनी संविधानातील अधिकार, कर्तव्ये, सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले व संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची गरज अधोरेखित केली आणि मूलभूत अधिकार यांची होत असलेली गळचेपी याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संजय काणतोडे,ईश्वर डहाके,दिलीप शेंडे,जयश्री बावनगडे,दिवरत्ना धारगावे, दिनकर म्हैसकर,डॉ.अनिल बोरकर, दिलीप दुपारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन करिष्मा खोब्रागडे तर आभार चांदणी घनकासार यांनी मानले. यावेळी महेंद्रपाल खोब्रागड, प्रकाश घनकसार,अजित खोब्रागडे,राजेंद्र भिमटे,मोहम्मद कमरुद्दीन, शुभम फुले,बाबुलालजी गजभिये, रुपेश वाडीभस्मे, राजेंद्र वासनिक, सुधिर तेलंगराव,पंकज रंगारी, राजू खोब्रागडे, विश्वनाथ निमजे,तुळशीराम कावळे,पौर्णिमा रामटेके, प्रदिप मानवटकर, दिलीप वासनिक छगन फुले,सुधीर शंभरकर, सुरेश वाघमारे,अनिल रामटेके,अशोक मेश्राम,मयुरी खोब्रागडे,कविता मेश्राम,चित्रलेखा कावळे,पौर्णिमा खोब्रागडेलता शंभरकर,चांदणी घनकासार,अर्चना रंगारी,रुपाली वाडीभस्मे, मितांश तसेच कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

शिवराया मंडई उत्सवाची उत्साहात सांगता; माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून स्व. उमेश बाग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन खंडाळा-पिपरी येथे शिवराया मंडई उत्सवाचा दोन दिवसीय...

  शिवराया मंडई उत्सवाची उत्साहात सांगता; माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून स्व. उमेश बाग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन खंडाळा-पिपरी येथे शिवराया मंडई उत्सवाचा दोन दिवसीय सोहळा; सांस्कृतिक...

२९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; जनआंदोलनातील खटल्यातून दोषमुक्ती

  २९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; जनआंदोलनातील खटल्यातून दोषमुक्ती नागपूर: नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी २९ वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल झालेल्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!