spot_img
spot_img
spot_img
spot_img

अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त मौदा शहरात विविध कार्यक्रम

 

अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

मौदा शहर प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने स्थानिक शिवाजी उच्च प्राथमिक शाळा मौदा येथे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, यामध्ये शाळा परिसरात वृक्षारोपण,शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, रांगोळी स्पर्धा,स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जीवन चरित्रावर भाषण स्पर्धा, विविध कार्यक्रम प्रदेश सरचिटणीस शिवराज (बाबा) गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज बाबा गुजर होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवशंकर सावनेरकर, ज्ञानेश्वर कुईकर, पृथ्वीराज गुजर, अफजल बेग,अशोक वासनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दिलीप सांनगडीकर, हर्षद ठक्कर, बिरू सिंग तोमर, मनोज कराडे, रितेश फुलबादे, आशिष पाटील, मौदा तालुक्याचे अध्यक्ष अरुण मदनकर, मीनाक्षी कावळे संगीता जवंजाळकर,साक्षी वर्मा, प्रकाश निनावे व शिवाजी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक पद्माकर वासनिक, अजय वैद्य, उज्वला हटवार प्रामुख्याने उपस्थित होते,मौदा शहरातील इतर शाळेतील Breastfeeding 300 झाडे वाटप करण्यात आले. या याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर नागपूर, दि. १ सप्टेंबर २०२६ — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने बजाज नगर येथील पक्ष...

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा मौदा, दि. २ सप्टेंबर — मौदा तालुक्यातील अदासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘श्री क्षेत्र बल्याची...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!