“ओळख” महाग्रंथासाठी रबडीवाला येथे बैठक; अॅड. कीर्तीमाला जयस्वाल मुख्य संयोजक
📍 प्रतिनिधी
विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभूतींचा गौरव करणारा “ओळख” हा महाग्रंथ प्रकाशित करण्याच्या दृष्टीने रबडीवाला येथे प्रकाशक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान अॅडव्होकेट कीर्तीमाला जयस्वाल यांनी भूषविले.
या बैठकीला पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीमती मीरा भट्ट, उद्योजक चिंदूजी वंजारी, पत्रकार नम्रता बागडे व डॉ. रुद्रसेन भजनकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
“ओळख” हा महाग्रंथ बहुआयामी स्वरूपाचा असणार असून, विदर्भातील गुणसंपन्न व्यक्तींचे कार्य, धार्मिक स्थळांचा ठेवा, तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान यांचे दस्तावेजीकरण करून प्रकाशित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी महाग्रंथाच्या मुख्य संयोजकपदी अॅड. कीर्तीमाला जयस्वाल यांची निवड करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक व संचालन साहित्यिक राजूभाऊ खवसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन समाजसेविका श्वेता शिंगाडे यांनी मानले.
सभेला पद्मा खवसकर, अमोल माणूसमारे, राजेश गडरिये, संगीता डहाके, लता वंजारी, श्रीधर वडे, आचल मेश्राम, धनराज कुलरकर, चिरंजीव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.




