नागपूर शहर ओबीसी काँग्रेसतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन!
महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
विदर्भ नंदन वृत्तसेवा
क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी फुले मार्केट, कॉटन मार्केट, नागपूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले.
महात्मा फुले यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, जातिभेद निर्मूलन आणि शोषित-वंचित समाजाच्या हक्कांसाठी केलेले कार्य ऐतिहासिक आहे. त्यांच्या सत्यशोधक विचारांनी भारतीय समाजात सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. आजही त्यांचे विचार सामाजिक न्यायाच्या लढ्याला प्रेरणा देणारे आहेत. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला नागपूर शहर ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पवार, अजय हटेवार, मोरेश्वर भादे, भूषण तल्हार, सचिन वैद्य, पिंकी सिंग भारत यात्री, चंद्रकांत हिंगे, प्रमोद शिंगणे, महेश श्रीवास, अशोक निखाडे, माधवराव गावंडे, संतोष गोटाफोडे, महादेव देने यांच्यासह नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि ओबीसी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.





