spot_img
spot_img
spot_img
spot_img

पेट्रोल डिझेलच्या भडक्याने काँग्रेस तीव्र तीव्र संताप आणि रस्ता

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला दिले निवेदन..

नागपूर प्रतिनिधी :-नागपूर येथे पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा व तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केंद्र व राज्य शासनापर्यंत जनतेच्या भावना पोहोचविण्यात आल्या.

सध्या देश गंभीर आर्थिक संकटातून जात असताना पेट्रोल व डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असतानाही केंद्र सरकार व राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील अन्यायकारक कर कमी करण्यास तयार नाहीत. ही सरकार जनतेसाठी नसून उद्योगपती अडाणी-अंबानी यांच्या हितासाठी काम करणारी सरकार असल्याचा घणाघात यावेळी करण्यात आला.

शेतकरी, कामगार, युवक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर इंधन दरवाढीचा थेट परिणाम होत असून प्रत्येक वस्तू महाग होत आहे. जनतेच्या प्रश्नांवर मौन धारण करणाऱ्या सरकारविरोधात आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

या अन्यायकारक दरवाढीविरोधातील लढ्यात प्रत्येक सामान्य नागरिकाने सहभागी व्हावे, असे जोरदार आवाहन यावेळी करण्यात आले. श्यामकुमार बर्वे, खासदार – रामटेक लोकसभा,यांच्या समवेत हजारो ने कार्यकर्ते उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

चेहडी- माथणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत भ्रष्टाचार..

चेहडी - माथणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत भ्रष्टाचार मौदा.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा) प्रदेश सरचिटणीस शिवराज (बाबा) गुजर यांनी केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत...

चेहडी- माथनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत भ्रष्टाचार

  चेहडी - माथणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत भ्रष्टाचार..     मौदा.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा) प्रदेश सरचिटणीस शिवराज (बाबा) गुजर यांनी केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!