spot_img
spot_img
spot_img
spot_img

एकात्मता विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली

एकात्मता विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली

नागपूर : सत्यमेव जयते शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरद्वारा संचालित एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा, नागपूर येथे संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये, तसेच लोकशाही मूल्ये यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय संविधान हे आपल्या देशाच्या लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असून, प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचा आदर करून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. संविधानाविषयी समाजात जनजागृती निर्माण व्हावी आणि नागरिकांमध्ये संविधानाबद्दल आदराची भावना रुजावी, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी विविध घोषणांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व पटवून देत परिसरातील नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद उरकुडे, सहाय्यक शिक्षिका शुभांगी कातुरे, सुनीता गावंडे व धनश्री ठेंगेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

 

Epaper Website

Related Articles

आक्रमण युवक संघटनेतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

  आक्रमण युवक संघटनेतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आक्रमण युवक संघटनेच्या नागपूर...

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन प्रतिनिधी -ईशिका धार्मिक नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे संविधान साजरा करण्यात आला. धापेवाडा येथील पंचशील बुद्ध विहार...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!