spot_img
spot_img
spot_img
spot_img

आरोग्य सुविधांचा आढावा घेत आमदार रामदास मसराम यांचा अधिकाऱ्यांना दणका; आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश!

 

आरोग्य सुविधांचा आढावा घेत आमदार रामदास मसराम यांचा अधिकाऱ्यांना दणका; आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश!

देसाईगंज :प्रतिनिधि , जे. बी शेख

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार व प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या अध्यक्षतेखाली २३ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय सभागृह, आरमोरी येथे एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली.

या सभेत आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या चार तालुक्यांसह धानोरा तालुक्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गावांमधील आरोग्य सुविधांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित भागांतील शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमधील सुविधा, औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णसेवा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा व औषधसाठा उपलब्ध राहावा आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने सेवा द्यावी, यावर आमदार रामदास मसराम यांनी विशेष भर दिला. आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक गडचिरोली डॉ. रवींद्र गावंडे, गटविकास अधिकारी देसाईगंज नीलेश ठाकरे, गटविकास अधिकारी कोरची फाये, नायब तहसीलदार दोनाडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आरमोरी कुर्जेकर, जिल्हा आरोग्य प्रतिनिधी डॉ. शिंदे तसेच वैद्यकीय अधिकारी आरमोरी डॉ. कोरेटी उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

नागपूरचे डॉ. हर्षवर्धन आर्य यांना इटलीतील आंतरराष्ट्रीय कॉनोमेट्रिक परिषदेत व्याख्यानासाठी निमंत्रण जगभरातील ३० निवडक इम्प्लांट तज्ज्ञांमध्ये नागपूरच्या डॉक्टरांचा समावेश

नागपूरचे डॉ. हर्षवर्धन आर्य यांना इटलीतील आंतरराष्ट्रीय कॉनोमेट्रिक परिषदेत व्याख्यानासाठी निमंत्रण जगभरातील ३० निवडक इम्प्लांट तज्ज्ञांमध्ये नागपूरच्या डॉक्टरांचा समावेश नागपूर : शहरातील प्रसिद्ध प्रोस्थोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट...

मानेवाडा चौकात श्री बाबा ड्रायव्हिंग स्कूलचा आलेला अनुभव ! देवराव प्रधान एका महिन्याच्या प्रशिक्षणातून आत्मविश्वासाने स्टेअरिंग हातात; श्री बाबा ड्रायव्हिंग स्कूलमधील शिकवण्याची पद्धत...

  मानेवाडा चौकात श्री बाबा ड्रायव्हिंग स्कूलचा आलेला अनुभव ! देवराव प्रधान एका महिन्याच्या प्रशिक्षणातून आत्मविश्वासाने स्टेअरिंग हातात; श्री बाबा ड्रायव्हिंग स्कूलमधील शिकवण्याची पद्धत अनुभवातून मांडली वाहन...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!