
शिवनी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या संघर्षाला मान्यवरांकडून उजाळा; मुकेश अग्रवाल यांची उपस्थिती
शिवनी : आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिकारक आणि जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती शिवनी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेला लढा तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण केले. त्यांचे जीवन अन्यायाविरुद्ध संघर्ष, त्याग, स्वाभिमान आणि समाजजागृतीचा प्रेरणादायी आदर्श असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या जयंती सोहळ्याला सौ. राधा अग्रवाल (माजी जिल्हा परिषद सदस्य), संजयजी आतीलकर (सरपंच, अदासा), गोरखनाथजी मडावी (माजी उपसरपंच, घोटमुंढरी), शालिनीताई गजभिये (पोलीस पाटील), मिलिंदजी गजभिये (माजी ग्रामपंचायत सदस्य), अशोकजी दळणे, देवा भाऊ मडावी, देवरावजी दळणे, राजूजी नेताम यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक, महिला, युवक आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या हक्कांचा, अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा सन्मान करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल उपस्थित होते.




