spot_img
spot_img
spot_img
spot_img

विकासाच्या प्रतीक्षेत सिरसीची स्मशानभूमी! मोडकळीस आलेले शेड, असमतल जागा आणि मूलभूत सुविधांचा अभाव; लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचे काय झाले? नागरिकांचा संतप्त सवाल!

विकासाच्या प्रतीक्षेत सिरसीची स्मशानभूमी!

मोडकळीस आलेले शेड, असमतल जागा आणि मूलभूत सुविधांचा अभाव; लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचे काय झाले? नागरिकांचा संतप्त सवाल!

अखिल रोडे- प्रतिनिधी

सिरसी : गावातील नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांपैकी एक असलेल्या स्मशानभूमीच्या विकासाकडे मात्र अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सिरसी येथे पाहायला मिळत आहे. गावातील स्मशानभूमी आजही विकासाच्या प्रतीक्षेत असून, येथील दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

स्मशानभूमीवरील शेडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेडचे पत्रे व इतर भाग तुटून मोडकळीस आले आहेत. तरीही त्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. स्मशानभूमी परिसराचे योग्य पद्धतीने सपाटीकरण (लेव्हलिंग) झालेले नाही. तसेच अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांचाही अभाव जाणवत आहे.

निवडणुकीच्या काळात गावाच्या विकासाबाबत आणि स्मशानभूमीच्या कामाबाबत विविध आश्वासने दिली जातात. मात्र निवडणुका संपल्यानंतर या आश्वासनांचे काय होते, असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. नागरिकांच्या आयुष्यातील शेवटच्या प्रवासाशी निगडित असलेल्या या ठिकाणाची अशी दुरवस्था असणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

स्मशानभूमीचा विकास हा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून तो गावाच्या मूलभूत गरजांचा आणि सामाजिक बांधिलकीचा विषय आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने विकासकामे हाती घेण्याची गरज आहे.

सिरसीच्या स्मशानभूमीचा विकास करणार तरी कोण?

मोडकळीस आलेल्या शेडची दुरुस्ती, परिसराचे सपाटीकरण, पाणी, प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सोयी-सुविधा कधी उपलब्ध होणार? की स्मशानभूमीचा विकास केवळ निवडणुकीपुरताच आश्वासनांचा विषय राहणार? असा सवाल आता सिरसीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष विकासकामे हवीत, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Epaper Website

Related Articles

“वो अंगारों पर लेटा है, अपना भारत देश…!” कन्हान में अखिल भारतीय कवि सम्मेलन बेहद सफल

“वो अंगारों पर लेटा है, अपना भारत देश…!” कन्हान में अखिल भारतीय कवि सम्मेलन बेहद सफल विदर्भ नंदन वृत्तसेवा कन्हान, प्रतिनिधि। “वो अंगारों पर लेटा है, अपना...

शिवसेना उमरेड शाखा सिर्सीच्या वतीने दिव्यांग बांधव व एकल विधवा महिलांना दिवाळी भेटीचे वाटप

  उमरेड शिवसेना शाखा सिर्सीच्या वतीने दिव्यांग बांधव व एकल विधवा महिलांना दिवाळी भेटीचे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण; सामाजिक बांधिलकी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!