spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिवसेना उमरेड शाखा सिर्सीच्या वतीने दिव्यांग बांधव व एकल विधवा महिलांना दिवाळी भेटीचे वाटप

 

उमरेड शिवसेना शाखा सिर्सीच्या वतीने दिव्यांग बांधव व एकल विधवा महिलांना दिवाळी भेटीचे वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण; सामाजिक बांधिलकी जपत शिवसैनिकांचा स्तुत्य उपक्रम

अखिल रोडे प्रतिनिधी

सिर्सी :-  दिवाळी सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून शिवसेना उमरेड शाखा सिर्सी यांच्या वतीने शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सिर्सी गावातील दिव्यांग बांधव तसेच एकल विधवा महिलांना दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप करण्यात आले.

 

सिर्सी येथील श्री रंगनाथ बाबा देवस्थान परिसरात हा वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिवाळीच्या सणानिमित्त गरजू व वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांप्रती आपली संवेदनशीलता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला शिवसेना उमरेड विधानसभा सचिव दिलीप सोनटक्के, उमरेड तालुका प्रमुख अभिषेक नान्हें, सुनील चिंचुकलकर, उपतालुका प्रमुख अखिल रोडे, नारायण वरभे, प्रभाकर वाकडे, गजानन राणे यांच्यासह अनेक शिवसैनिक तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.

 

दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या या भेटीमुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा शिवसेनेचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला.

 

Epaper Website

Related Articles

ब्रह्मपुरीत कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून दोन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप!

ब्रह्मपुरीत कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून दोन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप! कुलदीप कुलसिंगे व जिल्हाध्यक्ष भाग्यसिंग बावरी यांच्याविरुद्ध तक्रार; जिल्हाभरातील कथित वसुली प्रकरणांची सखोल चौकशी...

कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रा सह नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा!

कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रा सह नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा! ‎‎पाणी वाया घालवणाऱ्यांना समज द्या, गरज पडल्यास दंडात्मक कारवाई करा नागपुर जिल्हाधिकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!