spot_img
spot_img
spot_img
spot_img

कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रा सह नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा!

कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रा सह नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा!

‎‎पाणी वाया घालवणाऱ्यांना समज द्या, गरज पडल्यास दंडात्मक कारवाई करा नागपुर जिल्हाधिकारी सह नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना मागणी आव्हान!

‎कन्हान-पिपरी : राज्यासह जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागपुर जिल्हाधिकारी सह कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा विनाकारण होणारा अपव्यय तातडीने थांबविण्याची मागणी आव्हान करण्यात आले आहे.

‎

‎नागपूर जिल्ह्यातील सह नगरपरिषद क्षेत्रातील काही नागरिकांकडे खासगी बोअरवेलची सुविधा असून, त्यांच्याकडूनही पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच नगरपरिषदेच्या नळजोडणीधारकांकडूनही पिण्याचे पाणी विनाकारण वाया घालवले जात असल्याचे दिसून येते. सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, आजच योग्य खबरदारी घेतली नाही तर भविष्यात नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

‎

‎या पार्श्वभूमीवर नागपुर जिल्हाधिकारी सह कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मागणी करून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष ‘पाणी बचाव मोहीम’सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‎या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना प्रथम समज देणे आणि वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच नगरपरिषद प्रशासनाने विविध प्रभागांमध्ये नियमित पाहणी करून पाणी बचतीबाबत नागरिकांना सहभागी करून घ्यावे.

‎पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा टंचाई येण्यापूर्वीच पाण्याचे नियोजन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून त्याचा अपव्यय रोखणे ही प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आज पाणी वाचवले तरच उद्याची पाणीटंचाई टाळता येईल. असे सामजिक कार्यकर्ते यांनी सांगितले

Epaper Website

Related Articles

शिवसेना उमरेड शाखा सिर्सीच्या वतीने दिव्यांग बांधव व एकल विधवा महिलांना दिवाळी भेटीचे वाटप

  उमरेड शिवसेना शाखा सिर्सीच्या वतीने दिव्यांग बांधव व एकल विधवा महिलांना दिवाळी भेटीचे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण; सामाजिक बांधिलकी...

ब्रह्मपुरीत कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून दोन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप!

ब्रह्मपुरीत कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून दोन लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप! कुलदीप कुलसिंगे व जिल्हाध्यक्ष भाग्यसिंग बावरी यांच्याविरुद्ध तक्रार; जिल्हाभरातील कथित वसुली प्रकरणांची सखोल चौकशी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!