spot_img
spot_img
spot_img
spot_img

जिल्हा वकील संघटनेच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चा उत्साहात शुभारंभ

जिल्हा वकील संघटनेच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चा उत्साहात शुभारंभ

नागपूर : जिल्हा वकील संघटना, नागपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चा उद्घाटन सोहळा शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी रुबी क्लब, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती नंदेश एस.देशपांडे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान एम.एस. आजमी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांचे स्वागत ॲड. विकास कऱ्हाडे यांनी केले. माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सलमान आजमी यांचे स्वागत ॲड. वैशाली बगाडे यांनी केले. तसेच ॲड. विकास कऱ्हाडे यांचे स्वागत ॲड. धर्मराज बोघाटी आणि धीरेंद्र उपाध्याय यांनी केले. ॲड. वैशाली बगाडे यांचे स्वागत ॲड. स्नेहा पेटकर यांनी केले. ॲड. पंकज राजवाडे यांचे स्वागत ॲड. निशांत सिंघानिया व ॲड. नगमान अली यांनी केले. ॲड. विकास कऱ्हाडे यांनी प्रास्ताविक सांगितले. न्यायमूर्ती नंदेश एस. देशपांडे व माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान एम. एस. आजमी यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. ॲड. सौरभ राऊत यांनी संचालन केले तर ॲड. रोहित रामटेके यांनी आभार (Vote of Thanks) मानले.

आज या स्पर्धेत एकूण ५ सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. यावेळी जिल्हा वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. विकास कऱ्हाडे, उपाध्यक्षा ॲड. वैशाली बगाडे, सहसचिव ॲड. पंकज राजवाडे, ग्रंथालय प्रमुख ॲड. सौरभ राऊत तसेच कार्यकारिणी सदस्य ॲड. रोहित रामटेके, ॲड. सुशांत पाटील, ॲड. मंगेश लढे, ॲड. नवज्योत सोनी आणि ॲड. स्नेहा पेटकर उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अधिवक्त्यांना न्यायालयीन कामकाजाच्या व्यस्त दिनक्रमातून विरंगुळा मिळण्यासोबतच क्रीडाभावना, सांघिक एकता, बंधुभाव आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा वकील संघटनेच्या कार्यकारिणीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे अधिवक्ता वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Epaper Website

Related Articles

झाडीपट्टी रंगभूमीवरही दुष्काळाचे सावट! शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा नाट्यसंस्कृतीला फटका; नाट्यप्रयोगांकडे प्रेक्षकांची पाठ

  झाडीपट्टी रंगभूमीवरही दुष्काळाचे सावट! शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा नाट्यसंस्कृतीला फटका; नाट्यप्रयोगांकडे प्रेक्षकांची पाठ देसाईगंज (वडसा) गडचिरोली विशेष प्रतिनिधी :रियाज़ुल शब्बीर शेख तालुका प्रतिनिधी     विदर्भातील ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा म्हणून ओळखल्या...

शिवनी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या संघर्षाला मान्यवरांकडून उजाळा; मुकेश अग्रवाल यांची उपस्थिती

  शिवनी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या संघर्षाला मान्यवरांकडून उजाळा; मुकेश अग्रवाल यांची उपस्थिती शिवनी : आदिवासी समाजाचे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!