spot_img
spot_img
spot_img
spot_img

आक्रमण युवक संघटनेतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

आक्रमण युवक संघटनेतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण; संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आक्रमण युवक संघटनेच्या नागपूर शाखेतर्फे आज जाटतरोडी चौक येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाप्रती आदर आणि निष्ठा व्यक्त केली. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा अधिकार प्रदान केला आहे. संविधानातील मूल्यांचा आदर राखत सामाजिक एकता, समता आणि लोकशाही बळकट करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करताना उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधानातील मूल्ये आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमा दरम्यान ‘भारतीय संविधान चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत संविधानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात आली. आज २६ नोव्हेंबर २०२६ संविधान हा दिवस केवळ संविधानाच्या स्वीकाराची आठवण करून देणारा नसून, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आदर करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, बंधुता वाढवणे आणि लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारण्याचा दिवस आहे. या कार्यक्रमाला ओपूल तामगाडगे, सूरज पुराणिक, अतिश शंभरकर, अश्विन पाटील, प्रफुल खोब्रागडे, दीपक पाटील, दर्शन तामगार्डगे, संजय भाऊ शेंडे, राजूभाऊ मेश्राम, जुगनू भाऊ डोंगरे, अतिश बनकर, एकनाथ भाऊ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या सामूहिक सहभागातून संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

Epaper Website

Related Articles

एकात्मता विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली

एकात्मता विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा संविधान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली नागपूर : सत्यमेव जयते शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरद्वारा संचालित एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा,...

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त धापेवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन प्रतिनिधी -ईशिका धार्मिक नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे संविधान साजरा करण्यात आला. धापेवाडा येथील पंचशील बुद्ध विहार...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!