सिर्सि ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात पँथरचा संताप; संविधान दिन साजरा न केल्याने तीव्र निषेध
प्रतिनिधी :- अखिल रोडे
नागपूर / सिर्सि : २६ नोव्हेंबर २०२६ रोजी साजऱ्या झालेल्या ७७ व्या संविधान दिनी सिर्सि ग्रामपंचायतीने संविधानाचा दिनाचा कार्यक्रम आयोजित केला नाही. तसेच सरपंच, सचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, शासनाचे परिपत्रक असतांना ग्रामपंचायत सिर्सी ग्रामपंचायत ने संविधान दीन साजरा केला नाही. ज्यामुळे संविधानाचा अवमान झाल्याचा आरोप करत भारतीय दलित पँथरच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात पँथरचे नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष यशवंत अंबागडे यांनी सिर्सि ग्रामपंचायतीविरोधात निषेध व्यक्त करत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
*पँथर नेता यशवंत अंबागडे यांचे मनोगत*
सिर्सि ग्रामपंचायतीच्या या भूमिकेवर बोलताना यशवंत अंबागडे यांनी प्रशासकीय अनास्थेवर आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
*संविधानाचा अवमान आणि प्रशासकीय निष्क्रियता:*
“भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च आधार आहे. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनच संविधान दिनाकडे दुर्लक्ष करत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. ग्रामपंचायतीचा कारभार संविधानाच्या चौकटीत चालत नसल्याचे यातून स्पष्ट होते,” असे अंबागडे यांनी नमूद केले.
योजनांचा लाभ आणि #संवैधानिक मूल्ये:
“केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबवताना, संविधान दिवस हा केवळ औपचारिकता नसून तो आपल्या हक्क आणि कर्तव्यांचा दिवस आहे; त्यामुळे तो शासकीय थाटात आणि सन्मानाने साजरा होणे आवश्यक आहे.”
प्रतिमा लावण्याची आणि अभिवादनाची मागणी:
“ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी संवैधानिक निकषांनुसार निवडून आलेले असले, तरी सरपंच, सचिव आणि सर्व सदस्यांनी संविधान दिनाच्या दिवशी प्रतिमेचे पूजन व अभिवादन ग्रामपंचायतीत करणे बंधनकारक आहे.”
या निषेध मोहिमेद्वारे भारतीय दलित पँथरच्या वतीने पुढील मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत :
सिर्सि ग्रामपंचायतीच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर तात्काळ कारवाई करावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, नागपूर) तसेच प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन (मुंबई) यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायतींना संवैधानिक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत.




