spot_img
spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला

आरमोरी :-(ता. प्र.) शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे.
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री तथा माजी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली देत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
या वर्धापन दिना निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी च्या वतीने रुग्णालय आरमोरी येत फळ वाटप आणि वृक्षारोप करून वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी माझी आमदार श्री रामकृष्ण जी मडावी साहेब जिल्हा नियोजन समितीच्या माजीसदस्या कल्पनाताई तिजारे, शहर अध्यक्ष श्री प्रदीप हजारे. महासचिव,रामदास दहिकार जिल्हा कार्याध्यक्ष वृषाली भोयर, सुरेखा गोंधोले, शुभांगी गराडे, विद्या मेश्राम, भूमिका बागडे, रितिक निमंगडे, प्रशांत मोगरे, श्रीधर पोटेकर, राजू किरामे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर नागपूर, दि. १ सप्टेंबर २०२६ — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने बजाज नगर येथील पक्ष...

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा मौदा, दि. २ सप्टेंबर — मौदा तालुक्यातील अदासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘श्री क्षेत्र बल्याची...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!