डहाडी गाव पुनर्वसन प्रश्न ऐरणीवर.. पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल..
मौदा /नानादेवी :- अनेक वर्षापासून प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न कधी मार्गी लागेल? असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत असतांना, महसूल मंत्री तथा पालकमंत्री,नागपूर जिल्हा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच (11) जूनला गाव भेट दौऱ्यात त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची निर्देश उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना दिले, उपविभागीय अधिकारी यांना सूचना केल्यावर लवकरच पुनर्वचनाचा प्रश्न मार्गी लागणारे असे आश्वासन डहाडी ग्राम वासियांना दिले आहे. गेल्या 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने,,’ कन्हान ‘नदीला आलेल्या महापुरामध्ये संपूर्ण गाव पाण्याने वेढून,ग्रामीनांचे जीवन विस्कळीत झाले होते. घरे पडून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. जीवनावश्यक साहित्य वाहून गेल्याने व नाशधूस झाल्याने, लाखो रुपये आपत्ती निवारणार्थ सरकारने खर्च केले. अशी खर्चाची बाब वारंवार सरकार पुढे उद्भवू नये म्हणून ; आपत्तीग्रस्त लाल रेषेखाली असलेले, मौदा तालुक्यातील, डहाळी गाव,कन्हान नदीवरील पेच पाटबंधारे विभागाच्या “पेच ” प्रकल्प विसर्ग पात्रात येत असल्याने, राजस्व विभाग महसूल खात्याकडून बुडीत क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे. यामुळे या गावाचे पुनर्वसन होणे अत्यंत गरजेचे आहे. हे गाव नानादेवी ग्रामपंचायत मध्ये येत असून औद्योगिक क्षेत्र विकासात येतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील मागास क्षेत्राचे विकास करणे ही औद्योगिक क्षेत्राची सामाजिक उत्तरदायित्वता आहे. या आशयाचे निवेदन मंत्र्यांना यावेळी गाव भेटीदरम्यान देण्यात आले. तथा 2020 ला राज्याचे (भाजपा प्रदेशाध्यक्ष )असताना महापुरानंतर परिस्थितीची पाहणी बावनकुळे यांनी केलेली होती. तेव्हापासून नागरिक हे वारंवार निवेदन अर्ज विनंती करीत आलेले आहेत. मात्र अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न हा ऐरणीवर असून, प्रत्येक मान्सून सत्रात पुराचा धोका या गावाला भेडसावत असतो.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत माजी आमदार टेकचंद सावरकर, मौदा नगरपंचायत (नगराध्यक्ष) राजाभाऊ तिडके, नाना देवी (सरपंच) पांडुरंग अस्वले, (भाजपा) अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष नरेश मोटघरे, (एसडीओ) संजय पवार , तहसीलदार डी.निंबाळकर, (बीडीओ) महेश बेहरे, वीरेंद्र पायतोडे, (तलाठी बाबदेव साझा) अंजली शहारे , शुभम येळने, आनंद लेंडे,यांची उपस्तीथी होती, तर निवेदन कर्ते डहाडी ग्रामवासियांमध्ये (माजी ग्रामपंचायत सदस्य) कृष्णा बावणे, रामदास बावणे, हरिहर कांबळे, अशोक बावणे, (माजी ग्रामपंचायत सदस्या) सौ. कविता बावणे,वर्षा बावणे, अंजना बावणे, रज्जु लेदे, इंदिरा बावणे,करिष्मा बावणे, विनोद बावणे, ईश्वर वैद्य, वनिता बावणे, सुरेश लेदे, जोशना कांबळे,द्वारका वासनिक, राहुल वासनिक, यशवंत बावणे, जयराम बावणे, सह आदी गावकरी नागरीक निवेदन करतांना उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री यांनी लवकरच गावाचा पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले.




