spot_img
spot_img
spot_img
spot_img

निनो संकट

निनो संकट ..

 

अल निनोचे संकट

रे तयार नव्यादमाने

पाऊस अपेक्षा यंदा

पडे उतरत्या क्रमाने

 

वर्षावर्षाव भिजवेलं

घ्यायचे शांती दमाने

स्वागत अमृतधारेचे

करतो अतीव प्रेमाने

 

गत वर्षीचा महा पूर

ओसंडले सर्व रकाने

वाईटबातम्या ऐकता

बधीर झाली रा काने

 

संकटा लढण्यासाठी

तत्पर कधीचीचं मने

रुप भले घेऊद्या नवे

छळ वादी चित्त जुने

 

भरवसा उडून जाता

भाजती कोवळीउन्हे

निसर्ग क्रौर्य विक्षिप्त

खुडलेली स्वप्ने तान्हे

 

कधीचं नसे सुरक्षित

पावसा तव आवर्तने

दरवर्षी भिन्न कारणे

बिघडत जाती वर्तने

 

बळीराजा राबतराही

चिंबला संपूर्णघामाने

स्वप्नाचीपेरणी करतो

करेराखण परिश्रमाने

 

– हेमंत मुसरीफ पुणे.

9730306996.

 

बरोबर ..

 

हवामानखात्यातुझे

अंदाज असे बरोबर

कुणीम्हणो काहीही

आम्ही तुझ्याबरोबर

 

जोरातपाऊस पडेल

सांगून ठेवी अगोदर

कसे थेंब बरसतीलं

ढगां झाला जलोधर

 

हवाराहणारं कोरडी

बोललेयोग्यखरोखर

उद्याचापाऊस आज

येतो जरासा लवकर

 

भुकंपयेणार म्हणता

घाबरून बसे धरोवर

घालवूनटाके संकटा

कृपा करतो परमेश्वर

 

अंदाज तुम्ही करता

वादळयेणार भयंकर

आवरते घेतो तांडव

नवसा पावी शुभंकर

 

अद्य यावत मशीनरी

खात्या द्यावी हवीतर

ए आय वर्तवे अंदाज

नलगे मग जंतरमंतर

 

सुटून जाणारं माणूस

आळ येवो मशीनीवर

कोण देणार सल्ले ते

यावे कधी जमिनीवर

 

– हेमंत मुसरीफ पुणे.

9730306996.

Epaper Website

Related Articles

अनाथा ..

    वारीत घुसलाचोरटा काहीतरी लागे हाता हात जोडतो विठ्ठला ऐवज लाभूद्या आता   सहज सत्संग घडला वारी चालता चालता रंगूनगेलेला तो पुरता हरि हरि मुखे बोलता   टाळमृदुंगाच्या गजरी मुग्धहो झुलता हलता कपाळी अबीरगुलाल बदलून गेलाय भलता   गावे उसळती...

अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त मौदा शहरात विविध कार्यक्रम

  अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम मौदा शहर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने स्थानिक शिवाजी उच्च प्राथमिक शाळा मौदा येथे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!