spot_img
spot_img
spot_img
spot_img

मोरगावात जिम साहित्याचे लोकार्पण; गणरायाचे दर्शन घेऊन आरोग्याचा संदेश

🏋️‍♂️ मोरगावात जिम साहित्याचे लोकार्पण; गणरायाचे दर्शन घेऊन आरोग्याचा संदेश


मौदा तालुक्यातील मोरगाव येथे गावातील युवकांच्या आरोग्यवृद्धीसाठी महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आला. माननीय महसूल मंत्री तथा पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जिम साहित्याचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. राधाताई मुकेश अग्रवाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या उपक्रमामुळे गावातील तरुणांना नियमित व्यायामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाली असून, आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत गावाच्या विकासासाठी असेच उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

याच प्रसंगी मोरगाव येथील बाल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या लाडक्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

कार्यक्रमाला माजी Z.P. सदस्या सौ. राधाताई अग्रवाल, माजी तालुका अध्यक्ष मुकेशजी अग्रवाल, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गडे, फागो साठवणे, प्रदीप बांगरे, प्रकाश नान्होरे (तंटामुक्ती अध्यक्ष), महादुले ताई, धुरपता भोयर, प्रियंका बांगरे, कमलेश भोयर (ऑपरेटर), परमेश्वर उके, सुरेश बोरकर, विनोद वाघमारे (शाळा समिती अध्यक्ष), तसेच अश्विन गुरुभेले (स्वीय सहाय्यक) यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

नागपुरात पोलिसांची कारवाई : अवैध दारू विक्रीवर धडक, दोन आरोपींवर गुन्हे दाखल

नागपुरात पोलिसांची कारवाई : अवैध दारू विक्रीवर धडक, दोन आरोपींवर गुन्हे दाखल नागपूर (प्रतिनिधी) : शहरात अवैध दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत...

पाच बकऱ्या चोरीला; वयोवृद्ध दाम्पत्यावर उपासमारीची वेळ

पाच बकऱ्या चोरीला; वयोवृद्ध दाम्पत्यावर उपासमारीची वेळ एक लाख रुपयांचे नुकसान; ठाणेदार मांडवधारे यांच्याकडून चोरट्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाईचे आश्वासन   कन्हान : कन्हान शहरातील सुपर...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!