वारीत घुसलाचोरटा
काहीतरी लागे हाता
हात जोडतो विठ्ठला
ऐवज लाभूद्या आता
सहज सत्संग घडला
वारी चालता चालता
रंगूनगेलेला तो पुरता
हरि हरि मुखे बोलता
टाळमृदुंगाच्या गजरी
मुग्धहो झुलता हलता
कपाळी अबीरगुलाल
बदलून गेलाय भलता
गावे उसळती स्वागता
जथा भेटे उस्फुर्तदाता
ओसंडून वाहते झोळी
पुरे पुरे अरे किती देता
भजन किर्तनात रंगला
सुखवेहरिकथा ऐकता
वारकरीचेहरे सारखेचं
प्रत्येक कृत्यात एकता
दमूनसुखाने झोपे तो
छान अनुभवेस्वस्थता
रात्रीस चौर्यकर्मा मग्न
आधीअसे अस्वस्थता
ऐश्वर्या सामोरे पाहिले
न्याहळता पंढरीनाथा
चोरी सोडे न् वारी धरे
सनाथ केलेस अनाथा
– हेमंत मुसरीफ पुणे ..
९७३०३०६९९६.
देवा पाव ..
धाडी सत्र अहो रात्र
अग्रभागी असे नाव
वकील फौज सज्ज
करायला धावाधाव
आम्ही हो निरपराध
निरागस आविर्भाव
सहज फसवू लोकां
निष्कलंक हावभाव
अटकेसाठी या जरा
आडवे अख्खा गाव
अटकपूर्वजामीन ते
उधळून लावले डाव
कायद्याचे कच्चे दुवे
समस्त आम्हां ठाव
युक्त्या क्लृप्त्या करे
कार्यकर्ते करे उठाव
चॅनेल वाले साथीला
वधारून ठेवती भाव
सुटायला सोपा वाव
तो पुराव्याचा अभाव
नाटककंपनी काढली
करावा मासूम बनाव
स्वताहून दमून थकून
खोडूनि टाकालं नाव
स्वच्छकरावे चारित्र्य
रे पुन्हा बनायचे साव
देवा बुडवले पाण्यात
नवसाला जरासे पाव
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
सर नमस्कार
कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावी अशी विनंती




