आरमोरी पोलिसांची मोठी कारवाई : 15 लाख 65 हजार 180 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त, 05 आरोपी अटकेत
पोलीस स्टेशन आरमोरी हद्दीतील शेगाव टोली येथे अवैध दारू साठवणूक व वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून एकूण रु. 15,65,180/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन आरमोरी येथे अप. क्र. 215/2026, कलम 65(अ), 65(ई), 98, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. श्री. एम. रमेश सर, पोलीस अधीक्षक, गडचिरोली, मा. श्री. गोकुल राज. जी सर, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. अनिकेत हिरडे सर, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली.
मा. ASP तथा SDPO, गडचिरोली यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 10/06/2026 रोजी रात्री शेगाव टोली, आरमोरी येथील BSNL टॉवरजवळ प्रोव्हिजन रेड कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातील वाहन व गोदामाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारू, देशी दारू, बिअर तसेच हातभट्टी मोहा दारूचा अवैध साठा आढळून आला.
जप्त मुद्देमालामध्ये Royal Stag Deluxe Whisky, Tiger Brand Santri 5000, Rocket Deshi Daru Santra, Royal Challenge Premium Lager Beer, Kingfisher Strong Premium Beer, London Pilsner Premium Strong Beer तसेच हातभट्टी मोहा दारू यांचा समावेश आहे.
कारवाईमध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला :
• Royal Stag Deluxe Whisky – 180 ML च्या 1440 बॉटला व 2 लिटर क्षमतेच्या 09 बॉटला
• Tiger Brand Santri 5000 देशी दारू – 2650 बॉटला
• Rocket देशी दारू संत्रा – 4431 बॉटला
• Royal Challenge Premium Lager Beer – 360 टिन
• Kingfisher Strong Premium Beer – 120 टिन
• London Pilsner Premium Strong Beer – 24 टिन
• हातभट्टी मोहा दारू – 60 लिटर
• मारुती सुझुकी Swift VDI वाहन क्र. MH-34-AM-8969
सदर कारवाईमध्ये रु. 12,65,180/- किंमतीची विदेशी, देशी, बिअर व हातभट्टी मोहा दारू जप्त करण्यात आली असून दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मारुती सुझुकी Swift VDI वाहन क्र. MH-34-AM-8969 किंमत रु. 3,00,000/- जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे *एकूण रु. 15,65,180/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत* करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे :
1. सुनिल रामचंद्र जिभकाटे, वय 40 वर्षे, रा. शेगाव टोली, आरमोरी
2. अजय दादाजी राऊत, वय 40 वर्षे, रा. अंतरजी, ता. आरमोरी
3. राहुल राऊत, वय 35 वर्षे, रा. रामाळा, ता. आरमोरी
4. अजय राऊत, वय 30 वर्षे, रा. रामाळा, ता. आरमोरी
5. सुभाष तुलावी, वय 28 वर्षे, रा. दंवडी, ता. धानोरा, जि. गडचिरोली
सदर सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांना आज दिनांक 11/06/2026 रोजी माननीय न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड (PCR) मिळणेकामी विनंती करण्यात येणार आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे, पोलीस स्टेशन आरमोरी हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री. कैलास गवते, पोउपनि. संतोष कडाळे, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, पोलीस हवालदार रजनीकांत पिल्लेवान, पोलीस हवालदार वालदे, पोलीस शिपाई कुमेटी, पोलीस शिपाई रामटेके, पोलीस शिपाई आभारे, चालक पोलीस नाईक विस्कडे, पोलीस शिपाई सराटे व इतर पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




