spot_img
spot_img
spot_img
spot_img

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर

नागपूर, दि. १ सप्टेंबर २०२६ — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शिवराज (बाबा) गुजर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी, संघटनात्मक अडचणी, पक्ष विलीनीकरणाबाबतचे गैरसमज, तसेच तालुकास्तरीय शासकीय समित्यांमधील नियुक्त्या या विषयांवर विचारमंथन झाले. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि महायुतीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक व सार्वजनिक कामे मार्गी लावण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वानंतर आमदार सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली तसेच विदर्भातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नागपूर ग्रामीणमध्ये त्यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश माटे, जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष नरेश अरसडे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा वनमाळी, उद्योग व व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आशिष मदान, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष निशिकांत चौधरी, सेवादल जिल्हाध्यक्ष महाकाळकर गुरुजी, किसान सेल जिल्हाध्यक्ष हर्षद ठक्कर, राशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल नारनवरे, मौदा तालुका अध्यक्ष अरुण मदनकर, हिंगणा तालुका अध्यक्ष बिरोसिंग तोमर यांसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीतून नागपूर ग्रामीणमध्ये पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीचा संदेश देण्यात आला.

Epaper Website

Related Articles

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा मौदा, दि. २ सप्टेंबर — मौदा तालुक्यातील अदासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘श्री क्षेत्र बल्याची...

हत्तींच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराव; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसह ठोस उपाययोजनांची मागणी

📰 विशेष वृत्त | देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली 🐘 हत्तींच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराव; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसह ठोस उपाययोजनांची मागणी देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली :...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!