spot_img
spot_img
spot_img
spot_img

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा

झिरी देवस्थान विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर; भाविकांना मिळणार आधुनिक सुविधा

मौदा, दि. २ सप्टेंबर — मौदा तालुक्यातील अदासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘श्री क्षेत्र बल्याची पहाडी, निहारवाणी (झिरी देवस्थान)’ या ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना’ अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, यासंदर्भातील प्रशासकीय मान्यता शासनाने नुकतीच जारी केली आहे.

या निधीतून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास केला जाणार असून, भाविकांसाठी भव्य सभागृह, किचन, आधुनिक प्रसाधनगृहे, बी.टी. रस्ता, वाहनतळ, विद्युतीकरण, जलव्यवस्थापन तसेच आकर्षक लँडस्केपिंगची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या विकासकामांमुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच परिसराच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. मौदा परिसरातील नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करत, या प्रकल्पामुळे धार्मिक स्थळाचा विकास होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Epaper Website

Related Articles

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर

नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक; एकजुटीवर भर नागपूर, दि. १ सप्टेंबर २०२६ — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने बजाज नगर येथील पक्ष...

हत्तींच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराव; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसह ठोस उपाययोजनांची मागणी

📰 विशेष वृत्त | देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली 🐘 हत्तींच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक उपवनसंरक्षक कार्यालयाला घेराव; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसह ठोस उपाययोजनांची मागणी देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली :...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!