spot_img
spot_img
spot_img
spot_img

भोगवटाधारक स्वतः या खात्याचे वनमंत्री असल्याने कारवाईला विलंब, नागरिकात अधिकाऱ्याच्या कारवाई बाबत तीव्र नाराजी

नवी मुंबई / प्रतिनीधी
महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदी नुसार वने विभागाची जमीन कवडीमोल भाड्याने दिलेल्या जमिनीची निःपक्षपाती चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी पत्रकार जनसेवक बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे

१) गट क्र. ४२६/व, २) गट क्र. ३९७/व, ३) गट क. ४२८/व, ४) गट क्र. ४२८/अ, ५) गट क्र. ४३०, ६) गट क्र. ४३१, ७) गट क्र. ४३३ या सर्व गट क्रमांकांना महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदीस अधिन असे ७/१२ वरती नमुद आहे. या सातबा-याचे भोगवटाधारक श्री. गणेशजी नाईक वनमंत्री आहेत तसेच

२) १) गट क्र. ४३१, २) गट क्र. ४७५अ, ३) गट क्र. ४३१ हे गट क्रमांक मे. सुबह अॅग्रो लिमिटेड यांना ६० वर्षासाठी कवडीमोलाने प्रती एकर ५०० रूपये भाडेपट्टयाने दिले आहे. या सर्व प्रकरणाची
नी पक्षपातीपणे चौकशी होणेसाठी वनमंत्री महोदय यांना ०८.१२.२०२५ रोजी व १३.०१.२०२६ मंत्रालय येथे पत्र दिले होते तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांना १३.०१.२०२६ रोजी निवेदन दिले होते तसेच या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी १३.१२.२०२५ रोजी उपवन संरक्षण ठाणे यांना कार्यवाही करण्याचे सुचविले.

त्यानंतर ०६.०२.२०२६ रोजी उपवन संरक्षण ठाणे यांना आम्ही याबाबत तक्रार दिली असुन यावरती अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही होत नाही कारण भोगवटाधारक स्वतः या खात्याचे वनमंत्री असल्याने कारवाईला विलंब होत असल्याची चिंता बाळासाहेब मिरजे यांनी व्यक्त केली आहे.

Epaper Website

Related Articles

अनाथा ..

    वारीत घुसलाचोरटा काहीतरी लागे हाता हात जोडतो विठ्ठला ऐवज लाभूद्या आता   सहज सत्संग घडला वारी चालता चालता रंगूनगेलेला तो पुरता हरि हरि मुखे बोलता   टाळमृदुंगाच्या गजरी मुग्धहो झुलता हलता कपाळी अबीरगुलाल बदलून गेलाय भलता   गावे उसळती...

अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त मौदा शहरात विविध कार्यक्रम

  अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम मौदा शहर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने स्थानिक शिवाजी उच्च प्राथमिक शाळा मौदा येथे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!