नाना देवी ग्रामपंचायत अंतर्गत दहाडी गावात तान्हा पोळा उत्साहात; बाळगोपलांची वेशभूषा ठरली आकर्षण
📍 मौदा (प्रतिनिधी)
आधुनिक युगातही परंपरा जपत तान्हा पोळा सण मौजा संघटित नगर व डहाळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या सणाचे आयोजन युवासेना मौदा तालुका प्रमुख रुषभ बावणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक मंडळ, डहाळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या कार्यक्रमात शहराप्रमाणेच गावातही सजवलेले नंदीबैल सर्वांचे आकर्षण ठरले. विविध वेशभूषेत सजलेली लहान मुले विशेष लक्षवेधी ठरली. बाळगोपलांच्या निरागस सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी नंदीबैल धारकांना प्रोत्साहन म्हणून रुषभ बावणे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. नंदीबैलांची आकर्षक सजावट आणि मुलांच्या वेशभूषा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश बावणे, नितेश बावणे, विजय बावणे, आदेश बावणे, पियूष बावणे, आर्यन बावणे, अंशू बावणे, यश बावणे, आदिती मोटघरे व आयुषी बावणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पेश मेश्राम यांनी केली.




