spot_img
spot_img
spot_img
spot_img

पचखेडीत पारंपरिक ‘मारबत’ उत्सव उत्साहात; वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनाचा संदेश

 

पचखेडीत पारंपरिक ‘मारबत’ उत्सव उत्साहात; वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनाचा संदेश

आकाश ठाकरे

कुही (प्रतिनिधी):

कुही तालुक्यातील पचखेडी (गां) येथे गावाची जुनी परंपरा असलेला ‘मारबत’ उत्सव यंदाही मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही ग्रामस्थांनी जपली असून गावाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

मारबतच्या माध्यमातून समाजातील वाईट शक्ती, चुकीच्या प्रथा आणि नकारात्मक प्रवृत्ती दूर व्हाव्यात, तसेच गावात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदावी, अशी भावना व्यक्त करण्यात येते. हा उत्सव केवळ धार्मिक विधी नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि परंपरेप्रती असलेल्या श्रद्धेचे दर्शन घडवतो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने मारबत काढत गावातून मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

गावातील नागरिकांनी “जुनी परंपरा जपूया, संस्कृतीचा वारसा पुढे नेऊया आणि गावाची एकता कायम ठेवूया” असा संदेश देत या उत्सवाला विशेष महत्त्व दिला.

Epaper Website

Related Articles

आवळगाव शाळेत गांधी–शास्त्री जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानातून दिला आदर्श संदेश

  आवळगाव शाळेत गांधी–शास्त्री जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानातून दिला आदर्श संदेश ब्रम्हपुरी (प्रतिनिधी – सुरज सुर्यवंशी) : दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता जिल्हा...

मोरगावात जिम साहित्याचे लोकार्पण; गणरायाचे दर्शन घेऊन आरोग्याचा संदेश

🏋️‍♂️ मोरगावात जिम साहित्याचे लोकार्पण; गणरायाचे दर्शन घेऊन आरोग्याचा संदेश मौदा तालुक्यातील मोरगाव येथे गावातील युवकांच्या आरोग्यवृद्धीसाठी महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आला. माननीय महसूल मंत्री तथा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!