spot_img
spot_img
spot_img
spot_img

चेहडी- माथणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत भ्रष्टाचार..

चेहडी – माथणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत भ्रष्टाचार

मौदा.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा) प्रदेश सरचिटणीस शिवराज (बाबा) गुजर यांनी केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत मौदा तालुक्यात होत असणाऱ्या माथणी -चेहडी रस्त्याचे बांधकामावर आक्षेप नोंदविला संपूर्ण कामाची चौकशी पुढील आठवड्यात राज्य राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्यामार्फत होणार आहे केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम नुकतेच पार पडले डांबरीकरण देखील करण्यात आले परंतु गेले आठ महिन्यापासून कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे रस्ते बांधकामामध्ये वापरण्यात येणाऱ्या गिट्टी मुरूम व रोडच्या बाजूने मुरमाच्या ऐवजी मातीचे फिलिंग करण्यात आले. वारंवार स्थानिक नागरिकांनी तक्रार करून देखील बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही चेहडी व माथनी येथील नागरिकांच्या तक्रारीचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवराज (बाबा) गुजर यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा खुलेआम आरोप करण्यात आलेला आहे. स्थानिक नागरिकांनी कंत्राट दाराला व त्यांच्या इंजिनियर यांना वारंवार सूचना करून देखील चांगल्या दर्जाचे काम करण्यात आले नाही असा गुजर यांनी आरोप केलेला आहे लवकरच या रस्त्याची तपासणी राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्या टीम सह तपासणी होणार आहे. जर रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेत चुकीचे आढळले तर कंत्राट दारावर योग्य ती कारवाई केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले कंत्राट दरावर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुजर या यांनी केला.

 

Epaper Website

Related Articles

अनाथा ..

    वारीत घुसलाचोरटा काहीतरी लागे हाता हात जोडतो विठ्ठला ऐवज लाभूद्या आता   सहज सत्संग घडला वारी चालता चालता रंगूनगेलेला तो पुरता हरि हरि मुखे बोलता   टाळमृदुंगाच्या गजरी मुग्धहो झुलता हलता कपाळी अबीरगुलाल बदलून गेलाय भलता   गावे उसळती...

अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त मौदा शहरात विविध कार्यक्रम

  अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम मौदा शहर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने स्थानिक शिवाजी उच्च प्राथमिक शाळा मौदा येथे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!