📍 कोदामेंढी, दि. 22 जुलै 2026
मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोदामेंढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !
कोदामेंढी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान असून समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिराला नागरिक, युवक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक जबाबदारी पार पाडली.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष नगरपंचायत मौदा श्री. प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके, भाजपा मौदा तालुका मंडळ अध्यक्ष श्री. भगवानजी बावनकुळे, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. राधाताई मुकेशजी अग्रवाल, भाजपा मौदा तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य श्री. मुकेशजी अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मौदा शहर श्री. बंटीभाऊ हटवार, नगरसेवक नगरपंचायत मौदा श्री. राहुलजी पोटभरे, उपसरपंच कोदामेढी श्री. गोपालजी गिरमेकर तसेच श्री. अंकितजी वाडिभस्मे, श्री. राजूजी जेस्वाल, श्री. राहुलभाऊ हटवार, श्री. गुड्डूभाऊ पाथुरकर, श्री. सौरभ खरवडे, श्री. निखिल बडवाईक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




