spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिवनी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या संघर्षाला मान्यवरांकडून उजाळा; मुकेश अग्रवाल यांची उपस्थिती

 

शिवनी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी

आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या संघर्षाला मान्यवरांकडून उजाळा; मुकेश अग्रवाल यांची उपस्थिती

शिवनी : आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिकारक आणि जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती शिवनी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

याप्रसंगी मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेला लढा तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण केले. त्यांचे जीवन अन्यायाविरुद्ध संघर्ष, त्याग, स्वाभिमान आणि समाजजागृतीचा प्रेरणादायी आदर्श असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

 

या जयंती सोहळ्याला सौ. राधा अग्रवाल (माजी जिल्हा परिषद सदस्य), संजयजी आतीलकर (सरपंच, अदासा), गोरखनाथजी मडावी (माजी उपसरपंच, घोटमुंढरी), शालिनीताई गजभिये (पोलीस पाटील), मिलिंदजी गजभिये (माजी ग्रामपंचायत सदस्य), अशोकजी दळणे, देवा भाऊ मडावी, देवरावजी दळणे, राजूजी नेताम यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक, महिला, युवक आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या हक्कांचा, अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा सन्मान करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

दारूबंदीचा जिल्हा… तरीही अवैध दारूचा शाप कायम! गडचिरोलीच्या ३४ वर्षांच्या संघर्षाला पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

  दारूबंदीचा जिल्हा... तरीही अवैध दारूचा शाप कायम! गडचिरोलीच्या ३४ वर्षांच्या संघर्षाला पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह विशेष प्रतिनिधी रियाजुल शब्बीर शेख देसाईगंज (वडसा), जि. गडचिरोली. देसाईगंज (वडसा),...

विकासाच्या प्रतीक्षेत सिरसीची स्मशानभूमी! मोडकळीस आलेले शेड, असमतल जागा आणि मूलभूत सुविधांचा अभाव; लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचे काय झाले? नागरिकांचा संतप्त सवाल!

विकासाच्या प्रतीक्षेत सिरसीची स्मशानभूमी! मोडकळीस आलेले शेड, असमतल जागा आणि मूलभूत सुविधांचा अभाव; लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांचे काय झाले? नागरिकांचा संतप्त सवाल! अखिल रोडे- प्रतिनिधी सिरसी : गावातील नागरिकांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!