spot_img
spot_img
spot_img
spot_img

आदिवासी हलबा समाज, मौदा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

मौदा : आदिवासी हलबा समाज, मौदा यांच्या वतीने मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार यावर्षीही दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा श्रीकृष्ण मंदिर, मौदा येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष राजू बारापात्रे, माजी सरपंच व माजी समाज अध्यक्ष ज्ञानेश्वर कुहीकर, माजी नगरपंचायत उपाध्यक्ष राजेश निनावे, नगरसेवक मोरेश्वर सोरते, समाजाचे सचिव सुनील निनावे यांच्यासह आनंदराव माथणीकर, प्रकाश कुहीकर, तेजराम बारापात्रे, विनोद गोखले, संजय निनावे, प्रभाकर कोहाड, रूपचंद रायकोहाड, अशोक बारापात्रे, धनराज रायकोहाड, विलास निमजे, आशा वडवाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष शुभमजी तिघरे, नगरसेविका तारकेश्वरी बारापात्रे, अनिता भंडारी व आशिष काटकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी दहावी व बारावीतील एकूण २१ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यापैकी अंकीत दुर्वास धार्मिक आणि अमन राजेश नंदनवार या दोन विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
आदिवासी हलबा समाजाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व ट्रॉफी देण्यात आली. तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेश निनावे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेखा कोहाड यांनी केले तर आभार प्रदर्शन रामप्रसाद पराते यांनी मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीबाबत प्रेरणा निर्माण होत असून समाजाकडून होत असलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Epaper Website

Related Articles

1xBet app download APK BD: Complete guide

How to Download the 1xBet App (APK) in Bangladesh – Complete Guide Why Choose the 1xBet Mobile...

مراجعة شاملة لـ تحميل وان اكس بت في الإمارات

ما هو تحميل وان اكس بت؟كيف تختار منصة تحميل وان اكس بت موثوقة؟الخطوات الأولى للتسجيل في تحميل وان اكس بتإنشاء حساب سريعالتحقق من الهوية...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!